BMC Election 2026 BJP News: महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना आता मराठी आणि अमराठी वाद पेटला आहे. आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की, उत्तर भारतीय महापौर होईल या भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत. यावरून विरोधकांनी भाजपा महायुतीवर टीकेचे आसूड ओढले. यानंतर आता मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, असा दावा करण्यात आला आहे.
मुंबई मनपा निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली असून, आमचाच महापौर बसेल, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपा नेतेही महायुतीचा महापौर होईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. महापौर पदावरून निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही
कुराणावर हात ठेवत ममदानी यांनी महापौरपदाची शपथ घेतली. कुराणावर हात ठेऊन शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे… अशी लाचारी नको असेल आणि मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. धर्माचे नव्हे, विकासाचे राजकारण हवे. भाजपाच्या राजकारणाला विकासाचा ध्यास आहे, तर ठाकरे गटाच्या राजकारणाला हिंदुद्वेषाचा वास आहे. ‘द्वेष’ हवा की ‘ध्यास’ हवा हे ठरविण्याची हीच ती वेळ!, असे उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ‘हिजाब घालणारा महापौर का नाही’ विचारणाऱ्या एमआयएमची राज्यसभेत मदत घेणारी उबाठा, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्याला उमेदवारी देणाऱ्यांना विरोध करण्याची हिंमत दाखवू शकेल? ‘देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे’ असे उघडपणे मानणारी काँग्रेस इथल्या एखाद्या ममदानीला विरोध करू शकेल? धर्माच्या राजकारणाला बळी पडू नका… विकास आणि फक्त विकास हेच भाजपचे राजकारण!!, असे ते म्हणालेत.
Web Summary : BJP claims only they can ensure a Marathi Mayor for Mumbai, criticizing other parties' alleged appeasement of 'Mamdani' and prioritizing development over divisive politics. They question opposition's stance on Muslim representation and their commitment to secularism.
Web Summary : भाजपा का दावा है कि केवल वे ही मुंबई के लिए एक मराठी महापौर सुनिश्चित कर सकते हैं, अन्य दलों द्वारा 'ममदानी' के कथित तुष्टीकरण और विभाजनकारी राजनीति पर विकास को प्राथमिकता देने की आलोचना करते हैं। वे मुस्लिम प्रतिनिधित्व पर विपक्ष के रुख और धर्मनिरपेक्षता के प्रति उनकी प्रतिबद्धता पर सवाल उठाते हैं।