चिन्हांचे वाटप; शिस्त, नियम पालनाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:37 IST2026-01-05T12:37:46+5:302026-01-05T12:37:46+5:30
विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

चिन्हांचे वाटप; शिस्त, नियम पालनाच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिका निवडणुकीच्या रिंगणातीलसर्व अपक्ष उमेदवारांना शनिवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. दहिसर येथील आर-उत्तर प्रभागातील उमेदवार आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
आर-उत्तर प्रभाग (प्रभाग क्रमांक १ ते ८) च्या निवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेची रूपरेषा आणि राज्य निवडणूक आयोगाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली जाईल, याची खात्री केली.
या बैठकीला अपक्ष उमेदवारांना पारदर्शक पद्धतीने निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर झालेल्या संवादात्मक सत्रात देशमुख यांनी उमेदवारांच्या खर्चाबाबत, निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया आदींबाबत उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे आणि शंकांचे निराकरण केले. निवडणूक काळात निष्पक्षता, शिस्त आणि नियमांचे पालन करण्यावर भर देण्यात आला.
राजकीय पक्षांची चिन्हे निश्चित आहेत. मात्र, अपक्ष उमेदवारांना शनिवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली.