जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना काँग्रेसकडे २० जागांवर आणि वंचितकडे १६ असे मिळून या युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुजन वंचित आघाडीने जागा वाटपात आलेल्या १६ जागा काँग्रेसला दिल्या असल्या तरी या जागांवर काँग्रेसला उमेदवार देता आलेला नाही. काँग्रेस विरोधात वंचितने ज्या तीन जागांवर आपला उमेदवार उभा केला आहे, त्यापैकी एका जागेवर काँग्रेसला आणि एका जागेवर वंचितला दुहीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
वॉर्ड क्रमांक ११६ (भांडुप, हनुमान टेकडी) मध्ये काँग्रेसच्या संगीत तुळसकर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या राजकन्या सरदार रिंगणात आहेत. २०१७ च्या निवडणुकीत ही जागा ८,३२६ मतांनी काँग्रेसने जिंकली होती. तर, १५२ मते मिळवून भारिप बहुजन महासंघाच्या- (आताची वंचित बहुजन आघाडी) विद्या शिंदे ५व्या क्रमांकावर होत्या. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीपासून यंदा काँग्रेसला या जागेवर धोका नाही. मात्र, शिंदेसेना आणि भाजपची युती काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते.
वॉर्ड क्रमांक १४९ (मानखुर्द शिवाजीनगर)मधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या कन्या प्रज्योती हंडोरे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सोहन सदामस्त उभे आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ४,६७३ मते मिळवत ही जागा जिंकली होती. ३,२२३ मते घेऊन काँग्रेस ५ व्या स्थानावर होती. तर ३,८४८ मते घेत भारिपच्या सुरेख धायगुडे दुसऱ्या क्रमांकावर होत्या.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या जागेवर वंचित बहुजन आघाडीने दावा सांगितला होता. आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असल्याने काँग्रेसपुढे आव्हान आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांत ‘मैत्रिपूर्ण’ लढत होणार आहे. दोघांपैकी एकच उमेदवार असता तर अडचण नसती; पण दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
याकडे लक्ष द्यावे लागणार
वॉर्ड क्रमांक १८१ मध्ये काँग्रेसचे पप्पू यादव यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अजिंक्य पगारे आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ५,७३२ मते घेत विजय मिळवला होता. ५ व्या क्रमांकावरील भारिपला ६१९ मते मिळवली होती. मात्र या वॉर्डात रिपाइंने (आठवले गट) २३८८ मते घेतली होती, ही बाब काँग्रेसला दुर्लक्षित करता येणार नाही.
काँग्रेसकडे या जागांवर उमेदवारच नाही
वॉर्ड क्र. ६, ११, १२, १३, १४, १५, १९, २१, ३०, ४६, ८०, ८४, ११७, १५३, १८२, १९८
Web Summary : Congress-Vanchit alliance faces candidate shortages in 36 seats. Congress struggles in 20, Vanchit in 16. Internal competition threatens both parties in key wards. RPI's vote share could impact Congress negatively.
Web Summary : कांग्रेस-वंचित गठबंधन को 36 सीटों पर उम्मीदवारों की कमी का सामना करना पड़ रहा है। कांग्रेस को 20 और वंचित को 16 सीटों पर उम्मीदवार नहीं मिल रहे हैं। आंतरिक प्रतिस्पर्धा से प्रमुख वार्डों में दोनों दलों को खतरा है। आरपीआई का वोट शेयर कांग्रेस को नकारात्मक रूप से प्रभावित कर सकता है।