मुंबई: मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे प्रचार करण्यास किंवा उमेदवाराचे निवडणूक चिन्ह लावण्यास प्रतिबंध असतानाही कांदिवलीत प्रभाग २९ मधील मतदान केंद्रावर पालिकेचे निवडणूक कर्मचारी भाजपच्या 'व्होटिंग अॅप'चा वापर करताना आढळले. त्याविरोधात उद्धवसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समजते.
मतदान केंद्रावर मतदारांच्या मदतीसाठी असलेल्या हेल्प डेस्कवरील पालिका कर्मचाऱ्यांना मतदारांची नावे, मतदान केंद्र शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिकृत असलेले स्वतंत्र अॅप उपलब्ध दिले आहे. मात्र, मतदान केंद्र विचारण्यासाठी आलेल्या मतदारांना संबंधित पालिका कर्मचारी भाजपच्या स्थानिक अॅपचा वापर करून माहिती देत होते. त्यामुळे आपोआप मतदान केंद्रावर भाजपच्या निशाणीचा आणि उमेदवाराचा प्रचार होत होता, असा आरोप उद्धवसेनेचे उमेदवार सचिन पाटील यांनी केला. उद्धवसेनेचे उमेदवार सचिन पाटील यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यांची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र, अद्याप कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
Web Summary : Mumbai: Civic staff allegedly used a BJP app at a polling booth, aiding promotion. Despite a complaint by Shiv Sena (UBT), no action has been taken by election officials. An investigation is pending into the alleged violation of election rules.
Web Summary : मुंबई: पालिका कर्मचारियों ने कथित तौर पर मतदान केंद्र पर बीजेपी ऐप का उपयोग किया, जिससे प्रचार में मदद मिली। शिवसेना (यूबीटी) की शिकायत के बावजूद, चुनाव अधिकारियों द्वारा कोई कार्रवाई नहीं की गई है। चुनाव नियमों के कथित उल्लंघन की जांच लंबित है।