Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Budget 2026: महापालिकेच्या अर्थसंकल्पातून आज मुंबईकरांना काय मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 05:41 IST

अर्थसंकल्पावर भाजपची छाप असल्याने त्यात कोणत्या नवीन घोषणा असतील याची उत्सुकता तमाम मुंबईकरांना आहे.

 

मुंबई : देशात सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७चा अर्थसंकल्प बुधवारी (दि. २५) सादर करण्यात येणार आहे. 

अर्थसंकल्प प्रथम स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांना सादर केला जाईल. यावेळच्या अर्थसंकल्पावर भाजपची छाप असल्याने त्यात कोणत्या नवीन घोषणा असतील याची उत्सुकता तमाम मुंबईकरांना आहे.

उत्कंठा शिगेला, आश्वासनपूर्तीची अपेक्षा

महापालिकेवर गेली २५-३० वर्षे एकसंध शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता होती. या काळात अर्थसंकल्पावर शिवसेनेचाच प्रभाव होता. मात्र सत्ता भाजपकडे आल्याने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी किती तरतूद केली जाते, याची उत्कंठा आहे. 

अर्थसंकल्प दरवर्षी ४ फेब्रुवारीला सादर होतो. मात्र, पालिका निवडणुकीमुळे तो २० दिवस उशिरा सादर होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Awaits: What's in Store from BMC's 2026 Budget?

Web Summary : Mumbai's richest municipal corporation will present its 2026-27 budget on Wednesday. With BJP influence, citizens eagerly anticipate new announcements and fulfillment of promises, especially after years of Shiv Sena dominance. The budget, usually presented February 4th, is delayed due to elections.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअर्थसंकल्प २०२६भाजपा