BMC Budget 2024: मुंबई मनपाचं ५९,९५४ कोटींचं महाबजेट; पण महसुली उत्पन्नात घट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 11:59 AM2024-02-02T11:59:11+5:302024-02-02T11:59:49+5:30

मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२४-२५ साठीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवार दुपारी ११ वाजता मनपाच्या मुख्यलयात सादर करण्यात आले.

BMC Budget 2024 Mumbai Municipal Corporation 59954 Crore Budget decrease in revenue income | BMC Budget 2024: मुंबई मनपाचं ५९,९५४ कोटींचं महाबजेट; पण महसुली उत्पन्नात घट!

BMC Budget 2024: मुंबई मनपाचं ५९,९५४ कोटींचं महाबजेट; पण महसुली उत्पन्नात घट!

मुंबई-

मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२४-२५ साठीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवार दुपारी ११ वाजता मनपाच्या मुख्यलयात सादर करण्यात आले. मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज तब्बल ५९,९५४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात १०.५० टक्के इतकी वाढ झाली आहे. वित्तीय वर्ष २३-२४ चा आकडा ५४२५६.०७ कोटी इतका होता. मनपाच्या महसुली उत्पन्नात मात्र मागील अंदाजापेक्षा घट नोंदविण्यात आली आहे. 

२०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये २८६९३.३० कोटी इतके प्रत्यक्ष महसूली उत्पन्न प्राप्त झाले होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे महसूली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३३२९०.०३ कोटी एवढे प्रस्ताविण्यात आले होते. ते ३२८९७.६८ कोटी असे सुधारण्यात आले असून अंदाजामध्ये ३९२.३५ कोटींची घट झाली झाली आहे. 

३१ डिसेंबर २०२३ पर्यंत १९२३१.५५ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता अंदाजित महसूली उत्पन्न ३५७४९.०३ कोटी इतके प्रस्तावित आहे. जे २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत २४५९ कोटींनी अधिक आहे.

प्रकल्पांच्या स्वावलंबत्वाकरिता अभ्यासगट बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईमध्ये सागरी किनारा रस्ता (प्रिंसेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सागरी सेतू, वर्सोवा ते दहिसर, दहिसर ते मिरा-भाईंदर) व गोरेगांव मुलुंड लिंक रोड, मलजल प्रक्रिया प्रकल्प (STP) यासारखे मोठे पायाभूत प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमुळे वाहतुक कोंडी, वायू व ध्वनी प्रदुषण, इंधन वापर, इ. समस्या दूर होऊन मुंबईकरांना अनेक फायदे होतील. या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा दर्जा राखून ते वेळेत पूर्ण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात भांडवली खर्चाची आवश्यकता आहे.

या प्रकल्पांकरीता प्रचंड प्रमाणात असलेली भांडवली गरज विचारात घेता, हे प्रकल्प दिर्घकाळ वापराकरीता कार्यान्वित ठेवण्याच्या दृष्टीने आर्थिक सर्वेक्षण करण्यासाठी सल्लागारची नेमणूक करुन सदर प्रकल्पांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्याचे विचाराधीन आहे.

मिठी नदीच्या विकासासाठी पॅकेज 
मिठी नदीतील गाळ काढणे आणि इतर कामांसाठी भरगोस पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मिठी नदीच्या पॅकेज २,३ आणि चारमधील कामासाठी २०२४-२५ मध्ये ४५१ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन २०२४ मध्ये येणाऱ्या पावसाळयात मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदीमधून गाळ काढण्यासाठी अनुक्रमे ९३ कोटी, १०५ कोटी आणि ४५ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे.

राज्य शासनाकडून येणे असलेली थकबाकी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीपोटी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ८९३६.६४ कोटी इतके येणे आहे. ज्यामध्ये राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी ५९४६.३३ कोटी येणे असलेल्या रकमेचा अंतर्भाव आहे.

Read in English

Web Title: BMC Budget 2024 Mumbai Municipal Corporation 59954 Crore Budget decrease in revenue income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.