माहीम-वांद्रे दरम्यान उद्या मध्यरात्री कामांसाठी ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:35 IST2020-01-10T04:35:17+5:302020-01-10T04:35:27+5:30

पश्चिम रेल्वेमार्गावरील माहीम आणि वांद्रे दरम्यान तांत्रिक कामासाठी १०-११ आणि ११-१२ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ५.३०पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

Block for work at midnight between Mahim-Bandra tomorrow | माहीम-वांद्रे दरम्यान उद्या मध्यरात्री कामांसाठी ब्लॉक

माहीम-वांद्रे दरम्यान उद्या मध्यरात्री कामांसाठी ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील माहीम आणि वांद्रे दरम्यान तांत्रिक कामासाठी १०-११ आणि ११-१२ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ५.३०पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, माहीम आणि वांद्रे दरम्यान मार्गावरील दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धिम्या व जलद मार्गावरील लोकल फेºया रद्द केल्या जाणार आहेत.
१० जानेवारीपासून ते १२ जानेवारीपर्यंत मध्यरात्रीच्या काळात एकूण १८ धीम्या लोकलच्या फेºया रद्द केल्या जातील. याशिवाय, चार जलद लोकलच्या फेºया रद्द करण्यात येतील. ब्लॉकमुळे अहमदाबाद पॅसेंजर, गोल्डन टेम्पल मेल, वडोदरा एक्स्प्रेस उशिराने धावतील.
या धीम्या लोकल होणार रद्द
रात्री ११.०६ ची चर्चगेट ते वांद्रे, रात्री १२.३१ ची चर्चगेट ते अंधेरी,
रात्री १ ची चर्चगेट ते बोरिवली, पहाटे ३.५० ची बोरिवली ते चर्चगेट, पहाटे ४.०४ ची अंधेरी ते चर्चगेट, पहाटे ४.१३ ची विरार ते दादर, पहाटे
४.२३ ची बोरिवली ते चर्चगेट, पहाटे ४.२७ ची बोरिवली ते चर्चगेट, पहाटे ४.५७ ची वांद्रे ते बोरिवली,
पहाटे ५.०५ ची महालक्ष्मी ते बोरिवली, पहाटे ५.१५ ची चर्चगेट ते गोरेगाव, पहाटे ५.२० ची वांद्रे
ते बोरिवली, पहाटे ५.२० ची दादर-विरार, पहाटे ५.३५ ची वांद्रे
ते बोरिवली, पहाटे ६.११ ची वांद्रे
ते बोरिवली, पहाटे ६.०७ ची बोरिवली ते चर्चगेट, पहाटे ६.२० ची बोरिवली ते चर्चगेट.

Web Title: Block for work at midnight between Mahim-Bandra tomorrow