Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज आणि उद्या ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 10:07 IST

पुणे वाहिनीवर १८ मे रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्रीची तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती महाराष्ट्र राज्य विकास महामंडळामार्फत ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुणे वाहिनीवर २७ किमी आणि ५५ किमी अंतरावर ही कामे केली जाणार आहेत. त्यासाठी १८ आणि १९ मे रोजी महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. 

पुणे वाहिनीवर १८ मे रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने शेडुंग, खोपोलीमार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत, तर १९ मे रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत वाहतूक बंद करून द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने कुसगावरून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :मुंबईपुणे