रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:01 AM2018-10-20T06:01:10+5:302018-10-20T10:49:17+5:30

मुंबई : ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गासह हार्बरवरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम ...

The block on all three routes of the railway tomorrow | रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

Next

मुंबई : ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गासह हार्बरवरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक काळातील कामे करण्यात येतील.
ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत डाऊन जलद मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतील. यामुळे ठाणे-कल्याणमधील वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असल्याने लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. 


ब्लॉक काळात प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाºया जलद व अर्धजलद लोकल फेºयांना नियमित थांब्यासह अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.


पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, ब्लॉक काळातील वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.

पनवेल-वाशी लोकल सेवा बंद

हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक काळात या मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांसाठी सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ मार्गावर विशेष फेºया चालविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Web Title: The block on all three routes of the railway tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल