रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 05:39 IST2018-08-18T05:38:51+5:302018-08-18T05:39:12+5:30

कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवरील कुर्ला-वाशी अप, डाउन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, अंधेरी स्थानकांदरम्यान अप, डाउन जलद मार्गावरही ब्लॉक असेल.

The block on all three routes of the railway tomorrow | रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

मुंबई : कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवरील कुर्ला-वाशी अप, डाउन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, अंधेरी स्थानकांदरम्यान अप, डाउन जलद मार्गावरही ब्लॉक असेल.
कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंडनंतर त्या पुन्हा धिम्या मार्गावर धावतील.
बोरीवली-अंधेरीदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी २.३५ वाजेपर्यंत ब्लॉक आहे. या काळात लोकल फेऱ्या बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून वळविण्यात येतील.

विशेष फे-या : हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी
४. १० वाजेपर्यंत ब्लॉक आहे. या काळात या मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेºया चालविण्यात येतील.

Web Title: The block on all three routes of the railway tomorrow