तिन्ही मार्गांवरील आजचा ब्लॉक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:27 IST2019-04-14T06:27:08+5:302019-04-14T06:27:18+5:30

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

Block all the routes on today | तिन्ही मार्गांवरील आजचा ब्लॉक रद्द

तिन्ही मार्गांवरील आजचा ब्लॉक रद्द

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवासांना दिलासा मिळाला आहे. मेगाब्लॉक रद्द झाल्याने प्रवासी रविवारी नियोजित लोकल पकडून इच्छित ठिकाणी जाऊ शकतील. पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक तांत्रिक बाबीमुळे रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १३ एप्रिल रोजी मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यासह बदलापूर आणि कर्जतदरम्यान पायाभूत कामासाठी विशेष ब्लॉक घेतला होता. त्यामुळे बदलापूर ते कर्जत लोकल रद्द केल्या होत्या. मात्र, आता पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर घेण्यात आलेला जम्बोब्लॉक आणि हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Web Title: Block all the routes on today

टॅग्स :localलोकल