‘काळ्या आई’चं पोट रिकामं; अनेक पोषक घटकांची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:34 IST2025-02-18T10:33:57+5:302025-02-18T10:34:31+5:30
बहुतांश जमिनीत नायट्रोजन, गंधक, झिंक आणि लोहाच्या कमतरता दिसून येत आहे.

‘काळ्या आई’चं पोट रिकामं; अनेक पोषक घटकांची कमतरता
महेश घोराळे
मुंबई : असंतुलित रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, पिकांच्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थ आणि जैविक खतांचा कमी वापर, तापमान आदी विविध कारणांचा राज्यातील मातीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. बहुतांश जमिनीत नायट्रोजन, गंधक, झिंक आणि लोहाच्या कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षण करूनच योग्य खते वापरावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
या घटकांची कमतरता
सेंद्रिय कर्ब गंधक (सल्फर) झिंक लोह बोरोन
कमी ४६.०८% क्षेत्र ४३.५२% ४२.७७% ५९.९६% ३१.२९%
प्रमाण ०.५०% पेक्षा कमी <१०.० ppm <०.६ ppm <४.५ ppm <०.५ ppm
क्षेत्र १.४२ कोटी हेक्टर १.३४ कोटी हेक्टर १.३२ कोटी हेक्टर १.८५ कोटी हेक्टर ९६.६१ लाख हेक्टर
योग्य - ५६.४८% ५७.२३% ४०.०४% ६८.७१%
जास्त १४.०३% - - - -
प्रमाण ०.७५% पेक्षा जास्त >१०.० ppm >०.६ ppm >४.५ ppm >०.५ ppm
क्षेत्र ४३.३१ लाख हेक्टर १.७४ कोटी हेक्टर १.७६ कोटी हेक्टर १.२३ कोटी हेक्टर २.१२ कोटी हेक्टर
पिकांच्या वाढीसह उत्पादनावर थेट होतोय परिणाम
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या महाराष्ट्रातील जमिनीच्या आरोग्यावर आधारित अहवालातून पोषणतत्त्वांचे प्रमाण समोर आले. त्यात अनेक घटकांची कमतरता आहे.
राज्यात काही क्षेत्रे अत्यंत सुपीक, तर काही भागांत पोषणतत्त्वांची कमतरता असल्याने पिकांच्या वाढीसह उत्पन्न आणि गुणवत्तेवर याचा परिणाम दिसून येत आहेत.
मातीतील पोषणतत्त्वांची गरज लक्षात घेऊन, पीकनिहाय आवश्यक घटक आणि हवामान यानुसारच खते वापरण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे आहे.
डॉ. संजय भोयर, मृद विज्ञान विभाग, पीडीकेव्ही अकोला