Join us  

राज्यसभेची निवडणूक होणार बिनविरोध, भाजपाच्या विजया रहाटकर यांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 2:11 PM

भाजपाच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. 

मुंबई - भाजपाच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. सहा जागांसाठी होणा-या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र गुरुवारी (15 मार्च) रहाटकर यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.  राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. 

23 मार्चला राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होईल. भाजपाकडून प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, नारायण राणे  या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

 

टॅग्स :विजया रहाटकरभाजपा