Join us  

Raju Shetty : "महाराष्ट्राची बदनामी थांबवा, राज्य सरकार अस्थिर करण्याची भाजपची भूमिका अयोग्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 5:57 PM

सांगलीत शनिवारी पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले की, शेतकरीविरोधी धोरणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून यापूर्वीच बाहेर पडली आहे.

सांगली : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करून देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे, हे अयोग्य आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खा. राजू शेट्टी यांनी भाजपबाबत व्यक्त केले.

सांगलीत शनिवारी पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले की, शेतकरीविरोधी धोरणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून यापूर्वीच बाहेर पडली आहे. शेतकऱ्यांविरोधात केंद्र व राज्य सरकारचे एकमत आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. एफआरपीचे तुकडे, कर्जमाफीवरून आम्ही बाहेर आहोत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सत्तेत राहिली आणि नाही राहिली तरी आनंद, दु:ख होणार नाही. एक आहे की, केंद्रातील भाजप सरकारने कर्नाटक, आंध्र प्रदेशसह काही राज्यांतील सरकारे पाडली. हे आम्हाला चुकीचे वाटते.

सांगलीत शेट्टी-संजयकाकांची बंद खोलीत चर्चाभाजपचे खासदार संजयकाका पाटील व माजी खा. राजू शेट्टी यांची शासकीय विश्रामगृहावर भेट झाली. त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यानंतर वीस मिनिटे बंद खोलीत चर्चा केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराजू शेट्टीभाजपा