मुंबई महापालिकेच्या विराेधी पक्षनेतेपदावरील भाजपचा दावा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:54 AM2021-02-17T04:54:14+5:302021-02-17T04:56:24+5:30

Mumbai Municipal Corporation : राज्यात काॅंग्रेसने शिवसेनेसाेबत युती केल्याने काॅंग्रेसचा विराेधी पक्षनेतेपदावर अधिकार नाही, असा दावा करून भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते.

BJP's claim for the post of Leader of Opposition in Mumbai Municipal Corporation was rejected | मुंबई महापालिकेच्या विराेधी पक्षनेतेपदावरील भाजपचा दावा फेटाळला

मुंबई महापालिकेच्या विराेधी पक्षनेतेपदावरील भाजपचा दावा फेटाळला

Next

नवी दिल्ली : मुंबई महापालिकेच्या विराेधी पक्षनेतेपदावरील भारतीय जनता पक्षाचा दावा सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळला. कायदेशीर अधिकार हा राजकीय संबंधांवर अवलंबून नसल्याचे निरीक्षण नाेंदवून सरन्यायाधीश शरद बाेबडे यांच्या खंडपीठाने शिंदे याचिका फेटाळली.
महापालिकेत भाजप हा शिवसेनेनंतर दुसरा सर्वात माेठा पक्ष आहे. राज्यात काॅंग्रेसने शिवसेनेसाेबत युती केल्याने काॅंग्रेसचा विराेधी पक्षनेतेपदावर अधिकार नाही, असा दावा करून भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते. एकाच वेळी काॅंग्रेस राज्य सरकारमध्ये शिवसेनेसाेबत राहील आणि महापालिकेत 
विराेधात असेल, असे शक्य नसल्याचा युक्तिवाद शिंदे यांच्या वतीने ॲड. मुकुल राेहतगी यांनी केला. मात्र, 
तसे शक्य आहे, असे न्यायालयाने हा दावा फेटाळतांना स्पष्ट केले. भविष्यात भाजपचे शिवसेनेसाेबतचे नाते बदलू शकते. त्यामुळे कायदेशीर अधिकार त्यावर अवलंबून राहू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नाेंदविले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ८२ तर काॅंग्रेसने ३१ जागा जिंकल्या हाेत्या. काॅंग्रेसचे रवी राजा हे महापालिकेत विराेधी पक्षनेते आहेत.

भाजप फेरविचार याचिका दाखल करणार
मुंबई : विरोधी पक्षनेतेपदाबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळल्याने भाजप आता यावर फेरविचार याचिका दाखल करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपची याचिका फेटाळल्याने पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: BJP's claim for the post of Leader of Opposition in Mumbai Municipal Corporation was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.