भाजपाकडून मुंबईच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 02:00 AM2018-02-05T02:00:08+5:302018-02-05T02:00:30+5:30

‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आजही शिवसेना भाजपासोबत आहे. मात्र, भाजपाच्या नीतीला आमचा विरोध आहे. ज्या मुंबईने सर्वांना पोसले आहे, तिचे मोठेपण जपलेच पाहिजे. मुंबईचे मोठेपण संपता कामा नये.

BJP tries to nail Mumbai's narcotics | भाजपाकडून मुंबईच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न

भाजपाकडून मुंबईच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न

Next

मुंबई- ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आजही शिवसेना भाजपासोबत आहे. मात्र, भाजपाच्या नीतीला आमचा विरोध आहे. ज्या मुंबईने सर्वांना पोसले आहे, तिचे मोठेपण जपलेच पाहिजे. मुंबईचे मोठेपण संपता कामा नये. सर्व फायनान्स सेंटर मुंबईतून अहमदाबादला हलविणे, म्हणजे भाजपाकडून मुंबईच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ५ बेस्ट कामे करायची आहेत, जी हक्काने शिवसेना पुढच्या काळात सांगू शकेल,’ असे रोखठोख वक्तव्य शिवसेना आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी केले आहे. ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये चेतन ननावरे यांनी घेतलेली ही त्यांची सडेतोड मुलाखत...
मुळीच नाही. प्रत्येक मतदार संघाचा डीएनए वेगळा असतो. तो ओळखण्यासाठी ठरावीक वेळ लागतो. त्या मानाने योग्य कालावधीत स्वबळाची हाक दिली आहे. म्हणूनच निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांना त्यांची मानसिकता तयार करण्यात यंदा पुरेसा वेळ मिळणार आहे. म्हणूनच गत वेळच्या निवडणुकांत शेवटच्या क्षणी युती तोडण्याचा अनुभव पाहता, आत्ता झालेला निर्णय योग्य वेळी झाल्याचे वाटते.
सत्तेत राहून विरोध करणे कितपत योग्य वाटते?
शिवसेनेला सत्तेत रस नाही. आमची बांधिलकी जनतेशी समजतो. लोकांच्या बरोबरीने उभे राहणे सेनेचे काम आहे. विरोधक कमी पडत आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे. विरोधक भूमिका मांडत नसतील, तर आम्ही सत्तेत राहूनही लोकांची भूमिका मांडत राहणार. कारण कुणीतरी हे प्रश्न मांडायला हवेत. १५ वर्षे खुर्ची उबवल्याने त्या मानसिकतेतून बाहेर पडलेले नसल्याने, सेनेला नाइलाजाने विरोधकांचीही भूमिका पार पाडावी लागत आहे. विरोधकांचे काम विरोधक करत नाहीत.
शिवसेनेची ही भूमिका दुटप्पी वाटत नाही का?
सरकारमध्ये आमचा वाटा अल्प आहे. त्यात सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. एकूण कामगिरीत सरकार जिथे चुकतेय, तिथे आवाज उठवतोय. राज्यातील जनतेत चुकीचा संदेश जात असेल, तर आवाज उठविणार. राजकारणात प्रत्येक वेळी दुटप्पी भूमिका घेऊन चालत नाही. विरोधक मजबूत असते, तर सरकारला चुकीचा निर्णय घेताच आला नसता. संघटना म्हणून शिवसेना सरकारमधील चुकांवर हल्लाबोल करत राहणार.
तुम्ही वेगळे लढण्याचा फायदा आघाडीला होणार नाही का?
दुसºयाच्या घरी मूल झाल्यावर आपल्या घरी आनंद व्यक्त करण्यात काय हाशील आहे. सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतही भांडणे झाली आहेत. त्यामुळे आता जरी काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्रित लढण्याची घोषणा केली असली, तरी शरद पवारांचा पूर्व इतिहास पाहता, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, असे वाटत नाही.
वांद्रे वसाहतीतील सरकारी कर्मचाºयांच्या घराबाबत तुमची भूमिका काय?
मी स्वत: सरकारी कर्मचारी वसाहतीत लहानाचा मोठा झालो आहे. तिथे आयएएस, न्यायाधीश आणि कचरा वेचक झोपडपट्टीवासीयांनाही मोफत घरे दिली. मात्र, तिथे ३० वर्षांपासून राहणाºया सरकारी कर्मचाºयांना घरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी माफक दरात घरे देण्याची मागणी करण्यात काहीच गैर नसल्याचे वाटते. त्यांच्यासाठी यापुढेही आंदोलन करत राहणार आहोत.
पश्चिम उपनगरांतील प्रमुख समस्या कोणत्या वाटतात?
पश्चिम उपनगरात घनसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मूलभूत सोयी वाढविण्याची गरज आहे. मुंबईची नागरी सुविधांची रचना पुरातन काळातील आहे. त्यात बदल करण्यास फारच कमी संधी उपलब्ध आहे. येथील कचºयापासून वीजनिर्मिती केल्यास, स्थानिक गरज भागून राज्याला वीजपुरवठा करता येईल. त्यासाठी शांघायच्या धर्तीवर प्रयत्न सुरू आहेत. मिठी नदी साफसफाईचा प्रश्नही मार्गी लावायचा आहे.

Web Title: BJP tries to nail Mumbai's narcotics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.