मनोहर कुंभेजकर, मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) मुंबईच्या वतीने दादर येथील टिळक भवन येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. “इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६” दरम्यान काँग्रेस व युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह कृत्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आले.
भाजयुमोचे महामंत्री दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह टी-शर्ट परिधान करून “पीए इज कॉम्प्रमाइज्ड” तसेच इंडिया–यू.एस. व्यापार करारासंदर्भात घोषणा देण्यात आल्याचा आरोप भाजयुमोकडून करण्यात आला. या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा संघटनेने केला.
भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष व नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना यांनी सांगितले की, “एआय क्षेत्रात भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असताना अशा प्रकारची अराजकता निर्माण करणे अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेसने तात्काळ माफी मागून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
दरम्यान, या आरोपांवर काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. राजकीय वर्तुळात मात्र या घटनेमुळे वातावरण तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : BJYM protested against Congress in Dadar, Mumbai, condemning alleged actions during the 'India AI Impact Summit 2026'. They allege Congress workers wore PM Modi T-shirts with offensive slogans, harming India's international image, and demand an apology.
Web Summary : मुंबई के दादर में भाजयुमो ने 'इंडिया एआई इम्पैक्ट समिट २०२६' में कांग्रेस कार्यकर्ताओं के कथित आपत्तिजनक कृत्यों के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। उन्होंने भारत की छवि खराब करने का आरोप लगाया और माफी की मांग की।