Mumbai BMC: मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समितींच्या अध्यक्षपदासाठी २० आणि २३ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजप पक्षाकडून स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी प्रभाकर शिंदे यांनी तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवाडकर यांनी उमेदवारी अर्ज पालिका चिटणीस मंजिरी देशपांडे यांच्याकडे अर्ज दाखल केले. तसेच, सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी पालिका चिटणीस मंजिरी देशपांडे यांच्याकडे तर बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट उपक्रमाचे सचिव सुशील पवार यांच्याकडे सादर केला. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने उमेदवार न उभे केल्याने सदर निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानुसार, वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत देखील विरोधकांनी उमेदवार न दिल्यास हि निवडणूक देखील बिनविरोध होणार हे निश्चित आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
वैधानिक समिती निवडणुकीत युतीचा कित्ता महायुतीमध्ये कायम
मुंबई महापालिकेत शिवसेना (अखंड) आणि भाजप पक्षाने युतीद्वारे गेली २५ वर्षे सत्ता मिळवून वैधानिक समित्यांचे वाटप करून घेतले होते. त्यानुसार, त्यावेळी सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेकडे स्थायी समितीचे अध्यक्ष पद होते. तर सुधार समितीचे अध्यक्षपद हे भाजपकडे होते. शिक्षण व बेस्ट समिती अध्यक्षपदाचे वाटप देखील तसेच करण्यात आले होते. मात्र आता शिवसेनेत फूट पडून माजी मुख्यमंत्री आणि आताचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे दोन गट झाले आहेत. त्यापैकी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने महायुती करून यावेळी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ८९ जागा तर शिवसेनेला ( शिंदे) २९ जागा मिळाल्या. भाजप - शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आणि जोडीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ लाभल्याने भाजप आणि शिवसेनेत ठरल्याप्रमाणे सत्ता वाटप झाले.
त्यानुसारच, भाजपकडे महापौर पद, सभागृहनेते पद आणि चार वैधानिक समित्यांपैकी सर्वात महत्वाची स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि शिक्षण समिती अध्यक्षपद देण्यात आले आहे. तर, शिवसेनेकडे सुधार समिती अध्यक्षपद आणि बेस्ट समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. याचप्रकारे, विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाचे वाटप देखील भाजप आणि शिवसेनेत असणार आहे. मात्र शिवसेनेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार नगरसेवकांनी साथ दिल्याने कदाचित एखाद्या समितीचे विशेषतः नगरसेविका सईदा खान यांचा दांडगा अभ्यास असलेल्या आरोग्य समितीचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Web Summary : Prabhakar Shinde of BJP nominated for Standing Committee Head, Rajeshri Shirwadkar for Education Committee. Shiv Sena's Sandhya Doshi for Improvement, and Trushna Vishwasrao for BEST Committee posts. All positions likely unopposed.
Web Summary : भाजपा के प्रभाकर शिंदे ने स्थायी समिति अध्यक्ष, राजश्री शिरवडकर ने शिक्षा समिति के लिए नामांकन किया। शिवसेना की संध्या दोशी ने सुधार और तृष्णा विश्वासराव ने बेस्ट समिति पदों के लिए पर्चा भरा। सभी पद निर्विरोध होने की संभावना।