Join us  

मुंबईतील भाजप कार्यालयही ‘राम’मय; मंदिर उद्घाटनानिमित्त विविध कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 6:14 AM

राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त प्रदेश भाजपनेही १५ ते २२ जानेवारी दरम्यान विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ):राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त प्रदेश भाजपनेही १५ ते २२ जानेवारी दरम्यान विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन १५ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

गायक अनुप जलोटा, रामायण मालिकेतील कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखलिया यांना या निमंत्रित केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, गटनेते प्रवीण दरेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित असतील.

१६ जानेवारी : सोमा घोष यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम १७ जानेवारी : अलका झा, सुरेश आनंद आणि घनश्याम जी यांच्या भजन संध्येचे आयोजन२० जानेवारी : रामायण मालिकेतील अभिनेत्यांची उपस्थिती. २२ जानेवारी : पद्मश्री सुरेश वाडकर यांचा कार्यक्रम. 

टॅग्स :भाजपाराम मंदिर