Join us

'प्लीज मला इथून घेऊन चला'; वर्ध्याच्या भाजपा खासदाराच्या सुनेचा VIDEO रुपाली चाकणकरांकडून ट्विट, कुटुंबाकडून मारहाण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 10:23 IST

वर्ध्याचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा एक धक्कादायक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला आहे.

वर्ध्याचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा एक धक्कादायक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला आहे. व्हिडिओत दिसणारी महिला रामदास तडस यांच्या सून असल्याचं चाकणकर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं असून त्यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओत रडत रडत त्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्याकडे मदतीची विनवणी करत असल्याचं दिसून येत आहे. 

रामदास तडस यांच्या सुनेनं बनवलेला व्हिडिओ राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला आहे. यात संबंधित महिला रुपाली चाकणकर यांच्या मदतीचं आवाहन करत असून आपल्या जीवाला धोका असल्याचं व्हिडिओत म्हटलं आहे. "वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन गेली अनेक दिवस हे तडस कुटुंब मारहाण करुन अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आहे. तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहोचले आहेत", असं रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

व्हिडिओत नेमकं काय म्हणाल्या पूजा तडस?रुपाली चाकणकर यांच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट केला गेलेला व्हिडिओ भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. १२ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या जीवाला धोका असून रुपाली चाकणकर यांच्याकडे मदतीची विनवणी करत आहे. "मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जीवाला धोका आहे इथे, प्लीज मॅडम मला इथून गेऊन चाल. मी रिक्वेस्ट करते", असं या व्हिडिओतील महिला म्हणत आहे. 

 

टॅग्स :रामदास तडसराष्ट्रवादी काँग्रेस