bjp mns alliance signs, mns change flag colour | ''सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट''

''सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट''

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून, त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचा फोटो असलेला भगव्या रंगाचा बॅनर ट्विट केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट हा राज ठाकरेंचा फोटो असलेला भगव्या रंगातील बॅनर वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यामुळे मनसे खरंच पक्षाच्या झेंड्याचाही रंग अशाच प्रकारे बदलणार का?, याची चर्चा आता सुरू आहे.


तसेच राज ठाकरे आणि भाजपा यांच्यात युती होणार असल्याचंही बोललं जात होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला होता. राज ठाकरेंसोबत बैठक झाली का? याबद्दल बोलताना आमच्यात अनेक वेळा भेटी झाल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. पण मनसे आणि भाजपा एकत्र येण्याचे आजतरी कुठलीही चिन्हे नाहीत. मनसेच्या आणि आमच्या विचारात अंतर आहे. मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात आम्ही विचार करू, पण आजतरी ही शक्यता वाटत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी मनसेसोबतच्या आघाडीच्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिलं होतं. तर  बाळा नांदगावकरांनीही मनसे भाजपासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे येत्या 23 जानेवारीला राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता आहे. 

भाजप-मनसे एकत्र येणार? फायदा नेमका कोणाला होणार?

मनसे, भाजपाची युती होणार?; राजू पाटील यांनी केलं मोठं विधान

दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा बाणा जपणे अवघड जाणार आहे. ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी मनसेने आपल्या मूळ विचारधारेकडे परतावे, अशा प्रकारची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अद्याप याबाबत कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. २३ जानेवारीच्या पक्षाच्या मेळाव्यात याबाबत काही भाष्य होण्याची शक्यता आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे. 

राज-फडणवीस भेटीवरुन भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारांचे नवे राजकीय संकेत; म्हणाले की...

भाजप-मनसे एकत्र येणार? फायदा नेमका कोणाला होणार?

Web Title: bjp mns alliance signs, mns change flag colour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.