मुंबई : भाजपच्या राज्यातील आमदार, खासदारांची बैठक मुंबई भाजपाच्या कार्यालयात ९ आॅक्टोबरला होईल.संघटनात्मक निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक असली तरी त्या निमित्ताने मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू आहे. या बैठकीला जोडून दुसऱ्या दिवशी फेरबदल केला जाईल, असे म्हटले जात आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.कामगिरी अद्भभूत - लोणीकरमंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात ‘लोकमत’च्या शनिवारच्या अंकात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या संदर्भात, ‘निष्क्रियतेचा ठप्पा असलेले मंत्री’ असा उल्लेख केला होता. लोणीकर यांनी केलेल्या खुलाशात त्यांच्या विभागाची कामगिरी अद्भूत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आपल्या कार्यकाळात सुरू झाली. शौचालयांचे लक्ष्य १०० टक्के पूर्ण झाले. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी करार झाला, या कामगिरीकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.शिवसेना नेत्यांची ‘मातोश्री’वर चर्चाशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक घेतली. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक झाली. शनिवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे समजते.
भाजपा आमदार, खासदारांची ९ आॅक्टोबरला मुंबईत बैठक; फेरबदलाची चर्चा जोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 01:50 IST