मुंबई: बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारताचं नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून राज्यातील एमआयएमच्या दोन आमदारांची स्वाक्षरी असलेली लेटरहेड्स जप्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दोन्ही आमदारांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद अशी दोन आमदारांची नावं आहेत.कायमच बेकायदेशीर आण देशविघातक कृत्यं करणाऱ्या एमआयएमचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारताचं नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला गजाआड केलं. त्यांच्याकडून एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद यांची लेटरहेड्स सापडली. त्यामुळे या दोन्ही आमदारांना अटक करण्याची मागणी भातखळकर यांनी केली आहे.
एमआयएमच्या 'त्या' दोन आमदारांना तात्काळ अटक करा; भाजपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 14:37 IST