Join us

पालकमंत्री म्हणून निश्चितच सहकार्य करू; मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 06:34 IST

उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे सहकार्य लागेल, ते निश्चितच केले जाईल, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई: महापालिका क्षेत्रातील विविध कामांच्या दृष्टीने राज्य शासनाच्या स्तरावर समन्वय साधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधितांनी प्राधान्याने करावी, असे निर्देश देत उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासाठी पालकमंत्री म्हणून जे सहकार्य लागेल, ते निश्चितच केले जाईल, असे सांगितले. 

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी बैठक घेऊन महापालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. सध्या प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील उपनगरांमध्ये असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये पालकमंत्री आपल्या भेटीला या कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे. याकरिता महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांनी लोढा यांना महापालिकेच्या विविध कामांची व प्रकल्पांची माहिती दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मंगलप्रभात लोढामुंबई