Join us  

'त्या' भाजपा नेत्यांनी आता देवेंद्र फडणवीसांच्या जामिनाबाबत बोलावं; काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 1:59 PM

Devendra Fadnavis नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी टीकास्त्र सोडलं होतं.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांच्या जामिनावर काँग्रेस नेत्याचा टोला सोनिया गांधी, राहुल गांधींच्या जामिनावर पंतप्रधानांनी सोडलं होतं टीकास्त्र भाजपाला कोंडीत पकडण्याची काँग्रेसला मिळाली संधी

मुंबई - निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांबाबत माहिती लपवल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज कोर्टासमोर हजर राहावं लागलं होतं. फडणवीसांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावरुन काँग्रेसकडून भाजपा नेत्यांना टोला लगावण्यात आला आहे. 

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करुन म्हटलंय की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खोट्या केसमध्ये गुंतवण्याचे कारस्थान करुन त्यांना न्यायालयातून मिळालेल्या जामिनावर भाजपा नेत्यांनी अत्यंत हीन पातळीत टीका केली होती. त्यामुळे या नेत्यांनी आता गुन्हेगारी खटल्यात जामिनावर सुटलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. 

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी टीकास्त्र सोडलं होतं. कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करुन जामिनावर फिरणारे माय-लेकी मला नोटाबंदीवर विचारतात, त्याचमुळे यांच्या बनावट कंपन्यांना टाळे लागले. हे दोघे मला प्रामाणिकपणा शिकवत आहे असा टोला पंतप्रधानांनी काँग्रेसला लगावला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निमित्ताने काँग्रेसने भाजपावर टीका करण्याची संधी सोडली नाही. 

काय आहे प्रकरण? दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून सन २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित फौजदारी खटल्यांची पूर्ण माहिती न दिल्याबद्दल लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ ए अन्वये खटला चालवण्याच्या गेल्या वर्षी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल राखून ठेवला होता. नागपूर न्यायालयानं समन्स बजावल्यानं आज देवेंद्र फडणवीस न्यायालयासमोर हजर झाले. न्यायालयानं १५ हजारांच्या जातमुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर केला. यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. संबंधित केस संपल्यानं त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नव्हता, असं दावा केला.  

स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर

'१९९५ ते ९८ दरम्यान आम्ही  झोपडपट्टी काढण्याच्या कारवाई विरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी माझ्याविरोधात दोन खासगी तक्रारी झाल्या. त्या संपल्या असल्यानं प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या नव्हत्या. न्यायालयानं या प्रकरणात पुढची तारीख दिलेली आहे,' असं फडणवीस म्हणाले. या सगळ्यामागे कोणाचा हात आहे याची मला कल्पना आहे. त्यावर योग्य वेळी बोलेन. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील धार्मिक स्वातंत्र्यांची स्थिती खराब, ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकन संस्थेचा अहवाल

केंद्रीय संस्थांच्या दबावामुळेच तापस पॉल यांचे निधन; ममतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

आरक्षण वाचवण्यासाठी राहुल गांधींचा 'अवतार'; काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार

उद्धव ठाकरेंचा 'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातील : रामदास आठवले

खळबळजनक! पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याच्या धमकीचा आयएसआयने पाठवला मेल 

 

 

टॅग्स :सचिन सावंतदेवेंद्र फडणवीसन्यायालयनरेंद्र मोदी