उद्धव ठाकरेंचा 'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातील : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 12:57 PM2020-02-20T12:57:04+5:302020-02-20T13:04:45+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला न लागता उद्धव ठाकरे यांनी वेळीच सावध होऊन, बाळसाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत यावे असेही आठवले म्हणाले.

Ramdas Athawale criticizes Chief Minister Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा 'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातील : रामदास आठवले

उद्धव ठाकरेंचा 'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातील : रामदास आठवले

Next

मुंबई : "अजितदादा, आपण इतकी वर्ष उगाच वेगळे राहिलो, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं" अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर व्यक्त केली. तर यावरून बोलताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात की, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं. त्यांना काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे. तर गेल्यावेळी २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांना असा निर्णय घ्यायचा होता, तर ते घेऊ शकत होते. महाविकास आघाडीसोबत गेले असते, तर त्याचं सरकार सुद्धा आला असता. पण त्यांना तिकडे जाने वैचारीकदृष्ट्या अशक्य होते, असे आठवले म्हणाले.

मात्र उद्धव ठाकरे यांनी आता जो काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधातील आहे. तर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय फक्त मुख्यमंत्रीपदाच्या हौसेपायी घेतला असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे.

तर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावे, अजूनही वेळ गेली नाही. तुमचं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जमणार नाही. प्रत्येक मुद्द्यावरून वाद-विवाद होणार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला न लागता उद्धव ठाकरे यांनी वेळीच सावध होऊन, बाळसाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत यावे असेही आठवले म्हणाले.

Web Title: Ramdas Athawale criticizes Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.