Join us  

"सारथी संस्था बंद करुन दाखवाच, मग बघू मंत्री नवीन गाडीतून महाराष्ट्रात कसे फिरतात!"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 9:04 PM

नितेश राणे यांनी सारथी संस्था बंद केल्यास राज्य सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

मुंबई: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी राहिली आहे. ती बंद पडण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु आम्ही ते करु दिले नाहीत. गरिबातील गरीब मराठा समाज यातून उभा राहणार आहे. फेलोशिप आणि स्कॉलरशीप सारथीच्या माध्यमातून मिळत असून त्याचा फायदा अनेकांना होत आहे, असे मत असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आणि मराठा साम्राज्यात योगदान दिलेल्या सरदारांच्या घराण्याचे वंशज यांची मराठा सरदार परिषद ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

संभीराजेंच्या या विधानानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे देखील मैदानात उतरले आहे. नितेश राणे यांनी सारथी संस्था बंद केल्यास राज्य सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. राज्याचे मंत्रीच जाती जाती मध्ये भांडणे लावायला लागले आणि आपल अंग काढायला लागले मग हे सरकार काय कामाचे, असा सवाल नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. तसेच "सारथी"ला बंद करून दाखवाच आणि मग बघु मंत्री आपल्या नवीन गाडीतुन महाराष्ट्रात कसे फिरतात, असा इशारा देखील नितेश राणे यांनी सरकारला दिला आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी) राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी 'सारथी' संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत.

विजय वडेट्टीवारांकडून 'सारथी' काढून घ्या-

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना सारथीतून हटवतो अशी घोषणा केली. परंतु तसे न होता गुप्तांना संचालक केले गेले. सारथीचा तारादूत प्रकल्प बंद करण्यात आला आहे. त्यानंतर मराठा समाजाने आंदोलने, उपोषणे केली तरी राज्य सरकारने लक्ष दिले नाही. सारथीचे चाक रुतून पडण्यास मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांचा विभागच जबाबदार आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्याकडून एसबीसी प्रवर्ग आणि सारथी विभाग काढून घ्या.

- मराठा क्रांती मोर्चा

टॅग्स :उद्धव ठाकरेमराठा क्रांती मोर्चासंभाजी राजे छत्रपतीमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारविजय वडेट्टीवार