Join us  

Nitesh Rane : दोन वर्षांत सर्व वाईटच होतंय; नितेश राणे उद्धव ठाकरेंना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 4:06 PM

महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी या वादळाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज होत असताना BJP नेता नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. 

अरबी समुद्रात उठलेले ‘तौक्ते’ चक्रीवादळ (Cyclone Tauktae) गोव्यासह कोकणपट्टीत प्रचंड धुमाकूळ घालत मोठी पडझड करून वायव्येला गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी रात्रीपासून मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी  या वादळाचा प्रभाव लक्षात घेऊन सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी या वादळाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज होत असताना BJP नेता नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. 

''उद्धव ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात २०२० व २०२१मध्ये चक्री वादळ. २०२० व २०२१मध्ये कोरोना मृतांच्या संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर, अजूनही वाईट गोष्टी सुरूच आहेत. सर्व वाईटच होतंय,'' अशी टीका करताना नितेश राणे यांनी वादग्रस्त विधानही केलं आहे.  Cyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'

“शिवसेना भवनातून बॉलिवूड कलाकारांना फोन जातो, PR ट्विटसाठी २ ते ३ लाख रुपये दिले जातात, त्यानंतर...”

सत्ताधारी नेत्यांच्या PR वरून झालेल्या गोंधळात आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावले होते. राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लपवण्यासाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट केले जाते. यासाठी शिवसेना भवनातून अनेक कलाकारांना फोन केले जातात असा आरोप आमदार नितेश राणेंनी केला आहे. टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीतत त्यांनी हा आरोप केला होता. अलीकडेच करिना कपूर, कॅटरिना कैफ, फरहान यांच्यासारख्या बॉलिवूड कलाकारांचे ट्विट पाहिले तर लक्षात येते की, सेलेब्रिटींना पैसे देऊन ट्विट करायला लावलं जातं. इतकचं नाही तर आगामी अधिवेशनात याबाबत सगळे पुरावे सभागृहात मांडणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे.

“ठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणा”

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतील परिस्थिती बिकट झाली होती. मात्र,  महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. मात्र, देशभरात नावाजले जात असलेले ठाकरे सरकराचे मुंबई मॉडेल हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :नीतेश राणे उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्या