Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हिला तात्काळ बेड्या ठोका'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:58 IST

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेद हिच्यावर टीका केली आहे.

मुंबई- उर्फी जावेदची (Urfi Javed) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. रोज उर्फीच्या नावाची चर्चा होतेच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली. कमालीच्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. याचदरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. 

'शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' असं ट्वीट चित्र वाघ यांनी केलं आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. त्यामुळे पोलीस उर्फीविरोधात कारवाई करणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहे उर्फी जावेद? 

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, 'ऐ मेरे हमसफर, जीजी मां, मेरी दुर्गा, बेपनाह, चंद्र नंदिनी या शोमध्ये काम केलं आहे. २०१५मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

टॅग्स :उर्फी जावेदचित्रा वाघपोलिस