भाजप नगरसेविकेची कारवाई की ‘गुंडगिरी’? व्हिडीओ व्हायरल; स्थानिकांमध्ये संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:23 IST2026-03-18T14:23:00+5:302026-03-18T14:23:18+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, शाह यांनी महेश कोठारी यांच्या दुकानात जबरदस्तीने प्रवेश करून तेथील सामान रस्त्यावर फेकल्याचा आरोप आहे.

BJP corporator's action or 'hooliganism'? Video goes viral; anger among locals | भाजप नगरसेविकेची कारवाई की ‘गुंडगिरी’? व्हिडीओ व्हायरल; स्थानिकांमध्ये संताप 

प्रतिकात्मक फोटो...

मुंबई : बोरीवली येथील प्रभाग क्रमांक १५ च्या भाजप नगरसेविका जिग्ना निकुंज शाह यांची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई की ‘गुंडगिरी’?, असा सवाल करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने स्थानिकांमध्ये संताप उसळला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शाह यांनी महेश कोठारी यांच्या दुकानात जबरदस्तीने प्रवेश करून तेथील सामान रस्त्यावर फेकल्याचा आरोप आहे. दुकानात मंदिर असतानाही त्या आणि त्यांचे सहकारी चप्पल घालून आत शिरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी ही जागा खासगी मालमत्ता असल्याचे सांगत हस्तक्षेपास नकार दिला होता. मात्र, शाह यांनी कायदा हातात घेत कारवाई केल्याचे आरोप आहेत. 

दुकानात बेकायदा फेरीवाल्यांचे साहित्य
या संदर्भात भाजपचे स्थानिक आ. संजय उपाध्याय यांनी सांगितले की, एस. व्ही. रोड परिसरातील या दुकानात फेरीवाल्यांचे सामान ठेवल्याचे कारवाईवेळी शाह आणि पालिकेच्या आर-मध्य विभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या दुकानातून फेरीवाल्यांचे साहित्य बाहेर काढले. 

बेकायदा फेरीवाल्यांचे साहित्य संबंधित दुकानदाराने ठेवणे चुकीचे आहे. त्यांनी हे दुकान आहे की मंदिर, हे स्पष्ट करावे. दुकानात मंदिर असल्याचे लक्षात आले नसल्याने शाह तेथे चप्पल घालून गेल्या. आम्ही मंदिराचे पवित्र्य राखत पूजाअर्चा करू असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या संदर्भात शाह यांच्याशी संपर्क साधला असता, मी पालिका सभागृहात असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title : भाजपा पार्षद की कार्रवाई या गुंडागर्दी? वीडियो वायरल, स्थानीय लोग नाराज।

Web Summary : एक भाजपा पार्षद द्वारा कथित तौर पर जबरदस्ती एक दुकान में घुसकर सामान सड़क पर फेंकने का वीडियो वायरल होने से आक्रोश फैल गया है। दुकान के अंदर एक मंदिर का अनादर करने के आरोप भी हैं। पार्षद का दावा है कि उसने अवैध फेरीवालों का सामान हटाया।

Web Title : BJP corporator's action or hooliganism? Video goes viral, locals angry.

Web Summary : A video showing a BJP corporator allegedly forcibly entering a shop and throwing goods onto the street has sparked outrage. Accusations include disrespecting a temple inside the shop. The corporator claims she removed illegal hawker goods.

टॅग्स :Andheriअंधेरी