Join us  

धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यासाठी भाजपाचे गोरेगावात आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 1:53 PM

BJP agitation in Goregaon to reopen religious places : राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा नागरिकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही सदर ठिकाणी जमलो होतो असे जयप्रकाश यांनी सांगितले.

मुंबई - राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा नागरिकांसाठी खुली करावी म्हणून गोरेगावमध्येमंदिराजवळ भाजपचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर आणि गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला. त्यावर गोरेगाव पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले. गोरेगाव पश्चिमच्या जवाहरनगर परिसरात असलेल्या अंबा माता मंदिरात सोमवारी जयप्रकाश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्या ठाकूर, भाजप नेते दिलीप पटेल, नगरसेवक संदीप पटेल, नगरसेविका श्रीकला पिल्ले, अमेय मोरे, सचिन भिलारे, विक्रम राजपूत, गोरेगाव भाजपचे अध्यक्ष विजय गायकवाड हे सर्व गोळा झाले होते. 

राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा नागरिकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही सदर ठिकाणी जमलो होतो असे जयप्रकाश यांनी सांगितले. त्यावेळी गोरेगाव पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करत माझ्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याना ताब्यात घेतले असेही त्यांनी नमूद केले. त्यांना पोलिसांनी काही काळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. नंतर समज देत त्यांना सोडून देण्यात आले. 

टॅग्स :भाजपागोरेगावमुंबईमंदिर