वाढदिवस साजरा करण्याची विचित्र पद्धत, बर्थडे बॉयने कापले चक्क 550 केक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 12:33 IST2021-10-13T12:32:17+5:302021-10-13T12:33:37+5:30

मुंबईत झालेल्या या विचित्र वाढदिवसाला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

birthday news, mumbai news, Strange way to celebrate birthday, Birthday Boy cut 550 cakes | वाढदिवस साजरा करण्याची विचित्र पद्धत, बर्थडे बॉयने कापले चक्क 550 केक

वाढदिवस साजरा करण्याची विचित्र पद्धत, बर्थडे बॉयने कापले चक्क 550 केक

मुंबई: प्रत्येकाला आपला वाढदिवस मोठ्या आनंदाने-धुमधडाक्यात साजरा व्हावा असं वाटत असतं. हा दिवस आठवणीत राहावा यासाठी लोक खूप काही करतात. पण मुंबईतील एका व्यक्तीने त्याच्या वाढदिवशी असं काही केलं, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मुंबईतील एका बर्थडे बॉयने चक्क 550 केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. 


मिळालेल्या माहितीनुसार, हा आगळा-वेगळा वाढदिवस मुंबईच्या कांदिवली पश्चिम स्टेशन परिसरात झाला. सूर्या रतुरी असे या बर्थडे बॉयचे नाव आहे. गेल्या मंगळवारी सूर्याचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवशी त्याने 550 केकची ऑर्डर दिली. वाढदिवशी हे सर्व केक टेबलवर मांडण्यात आले आणि सूर्याने हे केक कापले. 

स्थानिकांची कारवाईची मागणी
व्हायरल व्हिडिओमध्ये 3 मोठ्या टेबलांवर 550 रंगीबेरंगी केक सजवण्यात आले आहेत. यानंतर, सूर्य दोन्ही हातांमध्ये चाकू घेऊन एकएक करत हे केक कापत आहे. यावेळी वाढदिवसामध्ये सामील झालेल्या बहुतेक लोकांनी मास्क घातला नव्हता. व्हिडिओमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचं दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी या प्रकरणी मुंबई पोलिस आणि बीएमसीकडे कारवाईची मागणी केली आहे.

Read in English

Web Title: birthday news, mumbai news, Strange way to celebrate birthday, Birthday Boy cut 550 cakes