मुंबई विमानतळावर प्रवेशासाठीचे पास लवकरच होणार बायोमेट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 07:37 AM2019-02-03T07:37:23+5:302019-02-03T07:37:37+5:30

मुंबई विमानतळावर प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पासचा गैरवापर होऊ नये व सुरक्षिततेचे प्रमाण अधिक वाढावे या हेतूने बायोमेट्रिक पद्धतीचे पास तयार करण्यात येणार आहेत.

 Bio-metric will soon be able to reach Mumbai airport | मुंबई विमानतळावर प्रवेशासाठीचे पास लवकरच होणार बायोमेट्रिक

मुंबई विमानतळावर प्रवेशासाठीचे पास लवकरच होणार बायोमेट्रिक

Next

- खलील गिरकर
मुंबई : मुंबईविमानतळावर प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पासचा गैरवापर होऊ नये व सुरक्षिततेचे प्रमाण अधिक वाढावे या हेतूने बायोमेट्रिक पद्धतीचे पास तयार करण्यात येणार आहेत. विमानतळावर प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना तिकीट पाहून बोर्डिंग पास दिले जातात. मात्र प्रवास न करणाºया व इतर कार्यालयीन कामकाजासाठी विमानतळ इमारतीत जाणाºया व्यक्तींना देण्यात येणारे पास यापुढे बायोमेट्रिक पद्धतीचे बनवण्यात येणार आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतची तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर असून लवकरच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
यामुळे सुरक्षेत वाढ होईल. विमानतळ इमारतीत प्रवेश करणाºया प्रत्येकाची माहिती ब्युरो आॅफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस)कडे जमा राहील. सध्या एका विभागात जाण्याचा पास असलेली व्यक्ती दुसºया विभागात प्रवेश करण्याचे प्रकार घडण्याची शक्यता असते. मात्र बायोमेट्रिक पद्धतीत दरवाजांनादेखील इलेक्ट्रॉनिक सुरक्षा व्यवस्था (एक्सेस पॉइंट) लागू करण्यात येणार असल्याने पुढील काळात असे प्रकार अशक्य होतील, असे सांगण्यात आले.
सध्या विमानतळाच्या विविध विभागांत काम करणाºया कर्मचारी, अधिकाºयांना, ग्राउंड हँडलिंग, केबिन क्रू व इतर आगंतुकांना पास दिले जातात. सध्या हे पास कार्ड लॅमिनेट करून दिले जातात. त्यासाठी अल्फाबेट कोड वापरले जातात. ए - अरायव्हल, डी - डिपार्चर, टी - टर्मिनल बिल्डिंग, एस - टर्मिनल बिल्डिंग सिक्युरिटी होल्ड एरिया असे विविध कोड वापरून पास दिला जातो.

एका क्लिकवर मिळणार माहिती

मुंबई विमानतळावर प्रवेश करण्यासाठी बनविण्यात येणारे पास बायोमेट्रिक होणार असल्यामुळे सध्या पास तयार करण्यासाठी लागणारा विलंब टाळणे शक्य होणार आहे. शिवाय आॅॅनलाइन पास बनणार असल्याने प्रवाशांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.

Web Title:  Bio-metric will soon be able to reach Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.