परवानगी देण्यापूर्वी रस्त्यावर धावू लागल्या बाइक टॅक्सी; रॅपिडो आणि ओलाचा मनमानी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:09 IST2025-04-26T10:07:44+5:302025-04-26T10:09:23+5:30

ही सेवा सुरू करण्यासाठी संस्थांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, याबाबतची नियमावली तयार करण्यापूर्वीच रॅपिडो आणि ओलाने ‘बाइक टॅक्सी’ सेवा सुरू केली आहे. 

Bike taxis started running on the roads before permission was given; Arbitrary management of Rapido and Ola | परवानगी देण्यापूर्वी रस्त्यावर धावू लागल्या बाइक टॅक्सी; रॅपिडो आणि ओलाचा मनमानी कारभार

परवानगी देण्यापूर्वी रस्त्यावर धावू लागल्या बाइक टॅक्सी; रॅपिडो आणि ओलाचा मनमानी कारभार

मुंबई : राज्यात बाइक टॅक्सीला परवानगी देण्यापूर्वीच ओला आणि रॅपिडो अशा खासगी सार्वजनिक वाहतूक संस्थांनी ही सेवा मुंबईत सुरू केली आहे. सुरक्षा मानकांचे उल्लंघन करून ही सेवा मुंबईत सुरू आहे.

एकट्याने प्रवास करणाऱ्यांना सुलभ वाहतूक सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी ई बाइक टॅक्सीला अटी, शर्तींसह परवानगी दिली आहे. त्यानुसार २१ एप्रिलला जीआर जारी करण्यात आला होता.  परिवहन विभाग याबाबत नियमवाली तयार करत आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी संस्थांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, याबाबतची नियमावली तयार करण्यापूर्वीच रॅपिडो आणि ओलाने ‘बाइक टॅक्सी’ सेवा सुरू केली आहे. 

नाव न सांगण्याच्या अटीवर एका रायडरने सांगितले की, १ एप्रिलपासून बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला ॲपद्वारे बुकिंग मिळण्यास सुरुवात झाली आहे तसेच कंपनीने कोणतेही नवीन नियम कळवलेले नाहीत.  

रॅपिडो आणि ओलाचे अधिकारी गप्प
रॅपिडोचे सीएमओ पवनदीप सिंग यांनी सांगितले की, आम्हाला काही दिवसांपूर्वी बाइक टॅक्सी चालवण्याची परवानगी मिळाली होती, परंतु जेव्हा त्यांना जीआरबद्दल विचारले तेव्हा त्यांनी माहिती देण्यासाठी वेळ मागितला, परंतु वेळ देऊनही त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान देण्यात आले नाही. यासोबतच, ओला अधिकाऱ्यांनी या विषयावर बोलण्यासही नकार दिला. महाराष्ट्रात अद्याप इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सुरू झालेली नाही, परंतु उबर त्यांच्या ॲपमध्ये बाइक बुक करण्याचा पर्याय दिसत आहे. मात्र, ती बुक केल्यानंतर, एकही बाइक बुक होत नाही.

मार्गदर्शक तत्त्वे 
ई-बाइक आवश्यक
पिवळा रंग हवा
चालकाचे पात्र वय : २० ते ५० वर्षे
दररोज कमाल कामाचे तास : ८ तास
प्रवाशांसाठी वयोमर्यादा : १२ वर्षांपेक्षा जास्त  
जीपीएस प्रणाली आवश्यक आहे.
मागे बसणाऱ्याने हेल्मेट घालणे आवश्यक आहे.  
ॲग्रीगेटर्सना चालकांना योग्य प्रशिक्षण द्यावे लागेल.  
कमाल अंतर १५ किमी
ड्रायव्हिंग लायसन्स आणि ट्रान्सपोर्ट बॅज आवश्यक

ॲग्रीगेटर्सना बाइक टॅक्सींसाठी परवाने दिलेले नाहीत. त्यामुळे अंमलबजावणी पथकाला बेकायदेशीर बाइक टॅक्सीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. - विवेक भीमनवार,  आयुक्त, परिवहन विभाग

पैसे वाचवण्यासाठी बाइक टॅक्सी बुक केली, पण ड्रायव्हर वेगाने बाइक चालवत होता. तसेच मला हेल्मेटही दिले गेले नाही.  - आकाश पाठक, पिलियन रायडर 

मी विक्रोळीचा रहिवासी आहे. रॅपिडो बंद झाल्यानंतर, बाइक टॅक्सी अनेक वर्षे बंद होती. पण १५ दिवसांपासून बाइक टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली आहे. 
बाइक टॅक्सी ड्रायव्हर

Web Title: Bike taxis started running on the roads before permission was given; Arbitrary management of Rapido and Ola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.