Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:20 IST

मुंबईतील विधान भवनला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांना विधान भवनामध्ये जाऊ दिले जात नाही.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका  ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून, या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विधान भवन परिसराचा ताबा घेतला आहे.

विधीमंडळाचे महत्त्वाचे अधिवेशन सुरू असतानाच हा धमकीचा ईमेल प्राप्त झाला, ज्यामुळे यंत्रणांची धावपळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विधान भवनामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आहे.  मुंबईपोलिसांचे पथक, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, इमारतीची कसून तपासणी केली जात आहे. 

सध्या विधीमंडळाचे कामकाज सुरू असल्याने विधान भवन परिसरात मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी मिळालेल्या या धमकीमुळे विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी हा ईमेल कोठून आला, याचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. ही धमकी केवळ अफवा आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा शोध पोलीस घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bomb Threat at Mumbai Legislature, Search Operation Underway

Web Summary : A bomb threat via email at Mumbai's Legislature disrupted the budget session. Police and security forces are searching the building, restricting access. Investigation underway to determine the threat's validity amid heightened security.
टॅग्स :विधान भवनमुंबईपोलिस