Join us  

Anti Love Jihad Bill: मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 2:46 PM

Anti Love Jihad Bill: हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याची तयारी सत्ताधारी पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे हे विधेयक अधिवेशनात चर्चेचे केंद्र ठकरण्याची शक्यता आहे

मुंबई - महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १९ डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे. जवळपास तीन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असल्याने या अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे. हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याची तयारी सत्ताधारी पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे हे विधेयक अधिवेशनात चर्चेचे केंद्र ठकरण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाजपाच्या अनेक आमदारांनी तसेच नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तसेच राज्यात लव्ह जिहादच्या काही घटना घडल्याच्या घटना घडल्याचा दावा भाजपाच्या आमदारांकडून केला जात होता. त्यातच लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीमध्ये तिचा लिव्ह इनमधील पार्टनर आफताब याने केलेल्या हत्येनंतर या मुद्द्यावर खूप चर्चा होत आहे. तसेच श्रद्धा वालकर हिची हत्या हा लव्ह जिहादच असल्याचा दावाही केला जात आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे.

आता या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच हे लव्ह जिहादविरोधी विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ते सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकावर आमदार नितेश राणे अधिक अभ्यास करत आहेत. तसेच महिलांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनीही अशा कायद्याची आवश्यता असल्याचे मत मांडले होते.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक मांडले गेल्यास हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तसेच या विधेयकाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :लव्ह जिहादमहाराष्ट्र सरकारभाजपा