Join us

BMCचा मोठा निर्णय, मुंबईत 15 डिसेंबरपासून सुरू होणार पहिली ते सातवीचे वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 13:14 IST

मुंबई :राज्य सरकारने उद्या म्हणजेच 1 डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, मुंबई महापालिकेने 1 ...

मुंबई:राज्य सरकारने उद्या म्हणजेच 1 डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, मुंबई महापालिकेने 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. महानगरपालिका आयुक्तांच्या परवानगीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. य्यानंतर मुंबई महापालिकेने 15 दिवसानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आयुक्तांच्या परवागीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारचा निर्णय मागच्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासदंर्भात माहिती दिली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे शाळा 1 डिसेंबरपासून सुरु होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

शाळा 1 डिसेंबरलाच सुरू होणार-राजेश टोपेराज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील शाळेसंदर्भात महत्वाची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते, ओमायक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठलिही भीती नाही. सध्या चिंता बाळगण्याची गरज नाही. पण, दक्षिण आफ्रिकेती त्याचा रिफ्लेक्ट झालेला प्रभाव लक्षात घेता, काळजी घ्यायला हवी म्हणून मुख्यमंत्र्यांसमेवत आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची बैठक झाली. त्यानुसार, 1 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होतील, असेही राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले.

जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचनाराज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा संचालनालयाकडून जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका स्तरावर या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर, शाळेत मास्क घालणे बंधनकारक, वैयक्तिक आणि शाळेत स्वच्छता, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :शाळामुंबईओमायक्रॉन