अभिजीत मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन देशासाठी शुभशकुनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 02:41 AM2020-08-05T02:41:35+5:302020-08-05T02:42:02+5:30

ज्योतिषीय दृष्टीकोनातून डॉ. मनीषा देशपांडे यांचे मत

Bhumi Pujan of Ram Mandir at Abhijeet Muhurat is auspicious for the country | अभिजीत मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन देशासाठी शुभशकुनी

अभिजीत मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन देशासाठी शुभशकुनी

Next

औरंगाबाद : पाच आॅगस्टला दुपारी १२:१५:१५ वाजता अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होत आहे. अभिजीत मुहूर्तावर सुरू केलेले कार्य निश्चितच निर्विघ्नपणे पार पडत असते. या मुहूर्तावर केलेल्या कार्याचा समस्त विश्वावर शुभप्रभाव पडत असतो, असे मत औरंगाबाद येथील ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ. मनीषा देशपांडे यांनी व्यक्त केले.

ज्योतिष शास्रानुसार चंद्राच्या दशेप्रमाणे दुपारी १२ वाजेच्या २४ मिनिटे आधी व २४ मिनिटे नंतर हा अभिजीत मुहूर्त काढला जातो. बुधवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटे व १५ सेकंदावर हा शुभमुहूर्त आहे, असे त्या म्हणाल्या. या वेळेस कुंभ रास व तुळ लग्न असेल. नक्षत्र शततारका प्रथम चरण राहील. चंद्र पंचमात असून, चतुर्थेश पण आहे. त्या स्थानात शनि स्वराशीत, लग्न स्वामी शुक्र भाग्यात राहुसोबत आहे. हा योग चांगल्या कामासाठी, धर्म कायार्साठी भाग्यकारक आहे. या स्थानात राहू परमोच्च स्थितीत आहे. ही खूप चांगली बाब आहे, असेही डॉ. मनीषा देशपांडे यांनी म्हटले आहे. काही ज्योतिषांना हा चांगला मुहूर्त वाटत नाही. पण तसे नाही. हा व्यक्तीचा नसून समष्टीचा विचार करणारा शुभ मुहुर्त आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्माच्या कार्यासाठी शुक्र पूर्ण बलवान १८ अंशावर आहे तर राहू अती उच्च स्थानी आहे.
केतू अती उच्च धनु राशीत आहे. एकंदरित या ग्रहस्थितीवर भूमिपूजन विश्वशांती व रामराज्य यासाठी पुष्टीकारक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जमिनीखाली पाच चांदीच्या विटा, त्यातील चार विटा चार दिशांना व एक ब्रह्मस्थानी ठेवणे वास्तू शास्त्रानुसार शुभ आहे. विशुद्ध चांदी पायाला शुद्ध व शक्तीशाली बनवते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. मोदींसाठी हे कार्य अत्यंत शुभ फलदायी ठरेल. शुभ असलेली चांदीची वीट त्यांना जगात मानाचे स्थान मिळवून देईल. तसेच भारतालाही प्रगतीचा वेगळा मार्ग देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२३ सप्टेंबरनंतर भारतावरील अनेक संकटे आश्चर्यकारकरीत्या दूर होतील. काही दिवसांतच पंतप्रधान मोदी फार मोठा व आश्चर्यकारक निर्णय घेतील, जो देशाच्या हिताचा व अनेकांसाठी अकल्पित असेल, असा अंदाज सुद्धा डॉ. मनीषा देशपांडे यांनी व्यक्त केला.

Web Title: Bhumi Pujan of Ram Mandir at Abhijeet Muhurat is auspicious for the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.