Join us  

निमंत्रणाच्या रागालोभावरून भूमिपूजनाचा समारंभच रद्द!, इंदू मिल स्मारकातील कार्यक्रमाचे निमंत्रण फक्त १६ जणांना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 2:41 AM

स्मारकाची उभारणी करीत असलेल्या एमएमआरडीएवर समारंभाची जबाबदारी होती. मात्र, १६ जणांनाच निमंत्रण देण्यात आले.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकातील पुतळ्याच्या भूमिपूजनाचा समारंभ राज्य सरकारला शुक्रवारी रद्द करावा लागला. सत्तापक्षांचे नेते व अन्य मान्यवरांना निमंत्रण नसल्याने वा वेळेवर न दिल्याने निर्माण झालेल्या रुसव्याफुगव्यातून हा प्रकार घडल्याचे समजते.स्मारकाची उभारणी करीत असलेल्या एमएमआरडीएवर समारंभाची जबाबदारी होती. मात्र, १६ जणांनाच निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आाघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्यासह अनेकांना निमंत्रण नव्हते.अजित पवार फिरले परतया समारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याहून मुंबईकडे निघाले; पण समारंभ रद्द करण्यात आल्याचे त्यांना कळल्यानंतर ते वाशीपासून पुण्याला परत गेले.- आनंदराज यांना शेवटच्या क्षणी कळविण्यात आले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेही बीडसाठी रवाना झाले होते. अर्थातच निमंत्रणाबाबतचा असा घोळ झाल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.सर्वांच्या सहभागाने भूमिपूजन करणारइंदू मिल येथे महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे; आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरमुंबईउद्धव ठाकरेअजित पवार