Join us
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईतही हिंसक पडसाद,चेंबूर-गोवंडी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 15:30 IST

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईमध्येही हिंसक पडसाद उमटले आहेत.

मुंबई- भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईमध्येही हिंसक पडसाद उमटले आहेत. कुर्ला, मुलुंड व चेंबूर परिसरात निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मुलुंडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टेशन रोड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, येथे राजकीय पक्षांनी मोर्चा काढत मुलुंड पोलीस उपायुक्तांना निवेदन दिले.  कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातही बस फोडण्यात आली आहे.  

घाटकोपर रमाबाई नगरजवळ बस क्रमांक 27च्या फोडल्या काचा.

 

टॅग्स :भीमा-कोरेगाव