Bhima Bibta's death, adopted by Ramdas VIII | रामदास आठवलेंनी दत्तक घेतलेल्या ‘भीम’ बिबट्याचा मृत्यू
रामदास आठवलेंनी दत्तक घेतलेल्या ‘भीम’ बिबट्याचा मृत्यू

मुंबई : बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नऊ वर्षांचा ‘भीम’ नर बिबट्याचा सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षांपासून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे भीम बिबट्याला दत्तक घेत होते.

२०१० साली शहापूर येथून बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेण्यात आले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव केंद्रात बिबट्याला ठेवून त्याची देखभाल केली जात होती. बिबट्याचा मृतदेह मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालानुसार, हृदयक्रिया बंद पडल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले, असे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 


Web Title: Bhima Bibta's death, adopted by Ramdas VIII
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.