भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर जयंतीसाठी पालिका सज्ज

By जयंत होवाळ | Published: April 13, 2024 06:49 PM2024-04-13T18:49:47+5:302024-04-13T18:49:56+5:30

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात.

Bharat Ratna Dr. Municipality ready for Babasaheb Ambedar Jayanti | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर जयंतीसाठी पालिका सज्ज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर जयंतीसाठी पालिका सज्ज

मुंबई :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने दादर येथील चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, 'राजगृह' येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. या अनुयायांना विविध नागरी सोयीसुविधा पुरवण्याच्या उद्देशाने पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रिनवर चैत्यभूमीतून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासोबतच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष सेवा इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याकरिता पालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमलेले आहेत. उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार अंबी यांच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

चैत्यभूमी परिसर सुशोभीकरण

चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्याना रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावट ही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात येत आहे. पालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच तोरणा द्वार, अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेक देखील सजवण्यात आले आहे.

Web Title: Bharat Ratna Dr. Municipality ready for Babasaheb Ambedar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.