Join us

भायखळा स्थानकाला लाभणार नवी झळाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 06:14 IST

भायखळा स्थानकाला ऐतिहासिक दर्जा प्राप्त आहे. भायखळा स्थानक हेरिटेज ग्रेड वनमध्ये येते.

मुंबई : भायखळा स्थानकाला ऐतिहासिक दर्जा प्राप्त आहे. भायखळा स्थानक हेरिटेज ग्रेड वनमध्ये येते. आता या स्थानकाला नवे रूप देण्याचे काम सुरू आहे. मुंबई हेरिटेज कमिटी, आय लव्ह यू मुंबई, आभा लांबा असोसिएशन यांच्या वतीने काम सुरू आहे. भायखळा स्थानकाच्या पश्चिमेकडील भागाची दुरुस्ती केली जात आहे. जुन्या दगडांना, वास्तूला घासण्याचे काम सुरू आहे. नुकतीच भायखळा स्थानकाची पाहणी आय लव्ह यू मुंबईच्या विश्वस्त शायना एन. सी. यांनी केली.

भायखळा हे मुंबईतील हेरिटेज स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला कोणताही धोका न पोहोचविता नवीन रूप दिले जाणार आहे. सध्या दगडांची पॉॅलिश करण्याचे काम सुरू आहे. या कामात काही ठिकाणी रेल्वेची मदत लागेल. ही मदत रेल्वे प्रशासनाने पुरवावी, असे शायना एन. सी. यांनी सांगितले. भायखळा स्थानक हे व्यस्त स्थानकांपैकी एक स्थानक आहे. मुंबई-ठाणे लोकल १८५३ साली चालविण्यात आली. तेव्हा सुरुवातीचे स्थानक भायखळा होते.

हे काम केले जाणार आहे

छताचे काम केले जाणार आहे. दरवाजे, खिडक्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. बाहेरील अतिरिक्त बांधकाम हटविले जाईल. रंगकाम केले जाईल. विद्युत तारा, टेलिफोन तारा सुस्थितीत करण्यात येतील. तिकीट घर, आरपीएफ कार्यालय सुस्थितीत केले जाईल.

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वे