काेश्यारी यांचे छत्रपती शिवरायांबद्दलचे ‘ते’ वक्तव्य समाजप्रबोधनाच्या हेतूने; हायकोर्टाने फाैजदारी कारवाईची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:09 AM2023-03-28T07:09:09+5:302023-03-28T07:09:17+5:30

थोर व्यक्तींचा अनादर करणारी विधाने म्हणून याकडे पाहिले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.      

BhagatSingh Koshyari's statement about Chhatrapati Shivaji Maharaj for the purpose of social awareness | काेश्यारी यांचे छत्रपती शिवरायांबद्दलचे ‘ते’ वक्तव्य समाजप्रबोधनाच्या हेतूने; हायकोर्टाने फाैजदारी कारवाईची याचिका फेटाळली

काेश्यारी यांचे छत्रपती शिवरायांबद्दलचे ‘ते’ वक्तव्य समाजप्रबोधनाच्या हेतूने; हायकोर्टाने फाैजदारी कारवाईची याचिका फेटाळली

googlenewsNext

मुंबई : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली विधाने ही इतिहासाचे विश्लेषण करणारी होती, असे निरीक्षण नोंदवित छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांच्याविषयी केलेल्या व्यक्तव्यांबाबत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची 
मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. 

कोश्यारींच्या विधानांचा सखोल विचार केल्यास हेतू स्पष्ट होतो. सध्याच्या काळात आपण इतिहासातून शिकले पाहिजे, असे न्या. सुनील शुक्रे व न्या. अभय वाघवासे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. थोर व्यक्तींचा अनादर करणारी विधाने म्हणून याकडे पाहिले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.      

विधानांवरून वक्त्याचे मत प्रतिबिंबित होते. प्रेक्षकांनी समाजाच्या चांगल्यासाठी काम करावे, हा या विधानांमागील हेतू आहे. समाजाच्या भल्यासाठी प्रबोधन करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा होत नाही.    - उच्च न्यायालय

काय म्हणाले होते कोश्यारी? 

‘तुम्हाला कोणी विचारले की तुमचा आदर्श कोण, तर बाहेर बघायची गरज नाही. इथे महाराष्ट्रात अनेक आहेत. शिवाजी जुन्या काळातील आहेत. मी नव्या युगाबद्दल बोलतोय’, असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले होते. 

 

Web Title: BhagatSingh Koshyari's statement about Chhatrapati Shivaji Maharaj for the purpose of social awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.