भरदिवसा तरुणाची सपासप वार करून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 22:08 IST2018-07-07T22:07:12+5:302018-07-07T22:08:15+5:30

अंधेरीतील डी. एन. नगर परिसरातील खळबळजनक घटना

Bhadrishi was arrested and murdered | भरदिवसा तरुणाची सपासप वार करून हत्या 

भरदिवसा तरुणाची सपासप वार करून हत्या 

मुंबई - अंधेरी येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर भररस्त्यात शुक्रवारी सकाळी एका २४ वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ अटक केली असून, ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आली की, काही वेगळे कारण होते, याचा तपास डी. एन. नगर पोलीस करीत आहेत. 

असगर अली खान (३०) असे अटक करण्यात आलेल्या माथेफिरू आरोपीचे नाव आहे. डी. एन. नगर पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या  वायएमसीए शाळेजवळ शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अभिषेक शुक्ला (२४) हा बीकॉमचा विद्यार्थी लायब्ररीत निघाला होता. त्यावेळी आरोपी अजगर खान याने अभिषेक याला अडवून त्याच्याकडील बॅगची मागणी केली. अभिषेक याने बॅग देण्यास नकार देताच संतापलेल्या अजगर खान यान आपल्याकडील चाकू काढून त्याने अभिषेक याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. भररस्त्यात सुरू असलेल्या या थरारक घटनेची माहिती डी. एन. नगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी खान याला अटक केली. 

छातीवर, पाठीवर अनेक वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अभिषेकचा मृत्यू झाला. अभिषेक मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असून बँकिंग कोर्सच्या अभ्यासासाठी मुंबईत आला होता. अजगर खान हा धार्मिक शिक्षणासाठी आसामला गेला होता असे सांगण्यात येत असून सहा महिन्यांनंतर तो चार दिवसांपूर्वीच मुंबईत परतला होता. आरोपी अजगर खानला खरोखर चोरीच करायची होती की, अभिषेक याला ठार मारण्यामागे त्याचा काही वेगळा उद्देश होता, याचा तपास पोलीस करीत आहे. 

Web Title: Bhadrishi was arrested and murdered