Mumbai Crime: बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना मुंबईच्या वरळी परिसरातून समोर आली आहे. वडिलांच्या सततच्या जाचाला आणि संशयाला कंटाळून एका २४ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने मृत्यूला कवटाळले. मात्र, संतापजनक बाब म्हणजे, मुलगी डोळ्यांसमोर गळफास लावून आत्महत्या करत असताना या बापाने तिला वाचवण्याऐवजी टाळ्या वाजवून तिचा मृत्यू होताना पाहिलं.
उच्चशिक्षित स्वप्नालीची आयुष्याशी झुंज संपली
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगावची रहिवासी असलेली स्वप्नाली घेवारी (२४), नवी मुंबईतील एका कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. ती वरळीतील महालक्ष्मी सोसायटीत आपल्या मैत्रिणींसोबत भाड्याने राहत होती.
दारूचे व्यसन आणि कौटुंबिक छळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील घेवारी हा शेतकरी असून त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. घरातून तो पत्नी स्वाती आणि मुलगी स्वप्नाली यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून स्वप्नालीची आई २६ एप्रिल रोजी मुंबईला आपल्या मुलीकडे राहण्यासाठी आली होती. मात्र, तिथेही या बापाने आपला जाच सुरूच ठेवला.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
१ मे रोजी रात्री सुनीलने पत्नी कोठे आहे, हे विचारण्यासाठी स्वप्नालीला वारंवार फोन करून भंडावून सोडले. वडिलांच्या या सततच्या छळाने स्वप्नाली प्रचंड तणावाखाली होती. तिने आईला फोन करून आपल्या मनातील भीतीही व्यक्त केली होती. रात्री ८ च्या सुमारास वडिलांशी तिचे कडाक्याचे भांडण झाले.
त्यानंतर स्वप्नालीने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी वडिलांना व्हिडिओ कॉल केला. समोर मुलगी गळफास लावून घेत असल्याचे दिसत असतानाही, त्या बापाला काही वाटले नाही. उलट, ती मरत असताना त्याने क्रूरपणे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
मेहुण्याच्या घरी जाऊन सांगितली घटना
स्वप्नालीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर सुनीलने थेट आपल्या मेहुण्याच्या घरी धाव घेतली. तिथे त्याने स्वप्नालीने आत्महत्या केल्याचे सांगतानाच टाळ्या वाजवून तिचा काटा काढला, आता आईचाही काढणार अशी धमकी दिली. सुनील घेवारी हे अमानवीय रूप पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी स्वप्नालीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, वरळी पोलिसांनी आरोपी पिता सुनील घेवारी याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका हसत्याखेळत्या मुलीचा तिच्याच बापाने घेतलेला हा मानसिक बळी मुंबईत चर्चेचा विषय ठरला आहे.
Web Summary : Mumbai: A father watched his daughter commit suicide on video call, clapping instead of helping. The 24-year-old victim was harassed by her father. Police arrested the father after the mother filed a complaint.
Web Summary : मुंबई: एक पिता ने वीडियो कॉल पर अपनी बेटी को आत्महत्या करते देखा और मदद करने के बजाय तालियाँ बजाईं। 24 वर्षीय पीड़िता को उसके पिता ने प्रताड़ित किया था। शिकायत के बाद पुलिस ने पिता को गिरफ्तार कर लिया।