डमी ॲपपासून सावधान; पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून पसार होतात ! मुंबई पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:13 IST2025-07-02T12:13:16+5:302025-07-02T12:13:42+5:30

फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होतेय वाढ

Beware of dummy apps; They spread by showing screenshots of payments! Mumbai Police appeal | डमी ॲपपासून सावधान; पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून पसार होतात ! मुंबई पोलिसांचे आवाहन

डमी ॲपपासून सावधान; पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून पसार होतात ! मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबई : लोकप्रिय पेमेंट ॲपच्या बनावट डमी ॲपचा सुळसुळाट झाला आहे. या ॲपमध्ये ओरिजनल ॲपसारखाच इंटरफेस, पेमेंट स्क्रीन आणि अगदी ट्रान्जॅक्शन साउंडसुद्धा असतो. चोरटे असे ॲप वापरून क्यूआर कोड स्कॅन करत ट्रान्जॅक्शनचा बनावट स्क्रीनशॉट व्हॉइस टोनही ऐकवतात. प्रत्यक्षात मात्र ते चुना लावून पसार होतात. त्यामुळे अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टार्गेटवर नेमके कोण ?

बनावट ॲपमार्फत फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टार्गेटवर दुकानदार, लहान मोठे स्टॉलवाले, व्यापारी किंवा सामान्य यूपीआय वापरकर्तादेखील असल्याचे घडलेल्या प्रकरणातून उघड झाले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहारापूर्वी पेमेंटची पडताळणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही बनावट यूपीआय ॲपना बळी पडणार नाही.

चोरटे ग्राहक असल्याचे भासवून दुकानात येतात.

ते बनावट ॲपद्वारे बनावट पेमेंट करतात.

ॲपमध्ये पेमेंट यशस्वी म्हणून दाखवले आहे आणि साउंडबॉक्समध्ये ‘पेमेंट मिळाले’ असा संदेश येतो.

दुकानदार ग्राहकावर विश्वास ठेवतो आणि वस्तू देतो, परंतु प्रत्यक्षात पैसे हस्तांतरित केले जात नाहीत.

एनआरआयला लुबाडले

अवघ्या १० मिनिटांच्या प्रवासासाठी २,८०० रुपये घेऊन तक्रारदार डी. विजय (४९) या एनआरआय व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या टॅक्सी चालकाला सहार पोलिसांनी अटक केली होती. विनोद गोस्वामीची टॅक्सी त्यांनी विमानतळावरून पकडली आणि दहा मिनिटांत ते विलेपार्लेच्या हॉटेलमध्ये पोहोचले. या प्रवासासाठी बनावट ॲपवर २,८०० रुपये भाडे त्याने घेतले होते.

कसा कराल बचाव ?

तुमच्या बँक खात्यावर किंवा मूळ यूपीआय ॲपवर जाऊन प्रत्येक वेळी पेमेंटची पडताळणी करा.

केवळ साउंडबॉक्स अलर्टवर अवलंबून राहू नका.

गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून यूपीआय ॲप डाउनलोड करा.

कोणत्याही ग्राहकाने अज्ञात किंवा नवीन पेमेंट ॲप वापरल्यास सावधगिरी बाळगा.

फसवणुकीची तक्रार तत्काळ सायबर हेल्पलाइनवर किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा.

सलून चालकही फसला...

एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत सलून चालवणारे बाबुलाल नापीत यांना बनावट ॲपद्वारे ६१,४५० रुपयांचा चुना लावण्यात आला. त्यांनी अनोळखी लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या संमतीशिवाय बनावट ॲप डाऊनलोड झाले. त्यातून हा प्रकार घडल्याचा त्यांचा आरोप आहे.

Web Title: Beware of dummy apps; They spread by showing screenshots of payments! Mumbai Police appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.