खंडित वीजपुरवठ्याबाबत गोंधळ उडवणारे मेसेज पसरवलेत तर खबरदार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 02:01 AM2020-10-31T02:01:06+5:302020-10-31T02:03:59+5:30

Mumbai News : सोशल मीडियावर मेसेजेस फॉरवर्ड केल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ आणि चिंता निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज पसरवू नये, असे आवाहन वीज कंपन्यांनी  वीज ग्राहकांना केले आहे.

Beware if you spread confusing messages about electricity outages | खंडित वीजपुरवठ्याबाबत गोंधळ उडवणारे मेसेज पसरवलेत तर खबरदार

खंडित वीजपुरवठ्याबाबत गोंधळ उडवणारे मेसेज पसरवलेत तर खबरदार

Next

मुंबई  - खंडित वीजपुरवठ्याबाबत सत्य जाणून न घेता व्हॉट्सॲप / सोशल मीडियावर मेसेजेस फॉरवर्ड केल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ आणि चिंता निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज पसरवू नये, असे आवाहन वीज कंपन्यांनी  वीज ग्राहकांना केले आहे.

मुंबईच्या उपनगरांतील ३० लाख ग्राहकांना खात्रीशीर व अखंडित वीजपुरवठा करणा-या अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने, खंडित वीजे बाबत माहिती (पॉवर आउटेज नोटिस) आपल्या वीजे वीज पुरवठा क्षेत्राच्या बाहेर प्रसारित न करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कारण, व्हॉट्स अ‍ॅप / सोशल मीडियावर अशा प्रकारे मेसेज फिरवल्याने अनावश्यक चिंतेचे  वातावरण, गोंधळ निर्माण होतो.

कॉल सेंटरला यामुळे अनावश्यक कॉल्स येतात. लोक कार्यालयांमध्ये येऊन विचारणा करत राहतात. ग्राहकांच्या ख-या समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. वीज  खंडित ही केवळ विशिष्ट भागापुरती मर्यादित असते. पण एखाद्या भागापुरती मर्यादित असलेली नोटिस अन्य भागांतही पोहोचवली जाते. आणि त्यातून ग्राहकांमध्ये चिंता पसरते.

पॅनिक बटन
 ग्राहकांनी त्यांना प्राप्त झालेल्या नोटिसा अन्य भागात पाठवू नये.
 ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते.
 गोंधळ उडतो.
 कॉल सेंटर्सना कॉल करून शंकेचे निरसन करून घेण्यात वेळ वाया जातो.
रिंंग नेटवर्क
 शक्य तेव्हा रिंग नेटवर्कचा वापर करून पर्यायी व्यवस्थेद्वारे वीजपुरवठा सुरू ठेवला जातो.
 रिंग नेटवर्क वीज पुरवठा क्षेत्रातील अनोखे नेटवर्क आहे.
 डिझेल जनरेटर सेट्सचाही उपयोग केला जातो. 

Web Title: Beware if you spread confusing messages about electricity outages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.