Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे तिसऱ्या दिवशीही काम बंद; दोन महिन्यांचा पगार थकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 12:34 IST

वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या कारणात्सव बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी सलग तिस-या गुरुवार दिवशीही काम बंद आंदोलन छेडले आहे.कुलाबा, वडाळा, ...

वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या कारणात्सव बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी सलग तिस-या गुरुवार दिवशीही काम बंद आंदोलन छेडले आहे.

कुलाबा, वडाळा, कुर्ला, वांद्रे, विक्रोळी या पाच आगारात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांनी पगारासाठी मंगळवारपासून  काम बंद आंदोलन छेडले आहे. बुधवारी विक्रोळी, वांद्रे आणि कुर्ला या आगारांतील कंत्राटी कामगारांनी सलग दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरु ठेवले. वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या अडचणींत आणखी वाढ होत असून, यावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

कंत्राटी तत्वावर काम करत असलेल्या कर्मचा-यांना दोन महिन्यांचा पगार कंत्राटदाराने दिलेला नाही. त्यामुळे आंदोलन पुकारण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले.

टॅग्स :बेस्टमुंबई