Join us  

बेस्टचे गैरहजर १५ कर्मचारी बडतर्फ; कामगार संघटनांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 3:01 AM

२४ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी बेस्टच्या गाड्या धावत होत्या

मुंबई : वारंवार सांगूनही गैरहजर राहणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बेस्ट प्रशासनाने अशा १५ कर्मचाºयांना आतापर्यंत बडतर्फ केले आहे.

२४ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी बेस्टच्या गाड्या धावत होत्या. त्यामुळे कर्मचाºयांना कामावर हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु यापैकी अनेक कर्मचारी वारंवार ताकीद देऊनही गैरहजर राहत असल्याने त्याचा ताण इतर कर्मचाºयांवर पडत होता. याची दखल घेत कामगारांच्या पगारात मोठी कपात केली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. बॅकबे, धारावी, देवनार, दिंडोशी आगारातील काही कर्मचाºयांचा यात समावेश आहे.कारवाई बेकायदेशीर असल्याने न्यायालयात दाद मागणार, असे बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. याबाबत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर व महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :बेस्टमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस